आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात रविवारी एक प्रवासी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि फुटबोर्ड यांच्यातील पोकळीमध्ये अडकला. सुदैवाने यावेळी आरपीएफच्या जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. प्रवासी चमत्कारिकरीत्या वाचल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. राजेंद्र मांगीलाल असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव असून तो अंधेरीच्या सात बंगला परिसरातील रहिवासी आहे. हा प्रवासी धावत प्लॅटफॉर्मवर आला आणि गाडी सुटत असतानाच ट्रेनच्या दाराचे हँडल धरले. ट्रेनच्या जिन्यावर पाऊल ठेवताच तो घसरला आणि ट्रेन व प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडला. हे पाहताच जवळच उभ्या असलेल्या आरपीएफ जवान पहुप सिंग यांनी तत्परतेने त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशाला पोकळीतून बाहेर काढले. काही वेळातच आणखी एक महिला पोलीस आणि इतर दोन लोक त्या प्रवाशाच्या मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्या सर्वांच्या तत्परतेमुळे मरणाच्या दाढेतून प्रवाशाची सुटका झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी