एसटीचा तो अधिकारी ठाकरेंच्या प्रेमातला आहे, त्याला अटक करा, सदावर्ते यांनी केली मागणी
अंजली दमानिया यांनी पत्रकारासमोर एक खेळ मांडला आहे.आपण काही तरी अजूबा करणार असा भास त्यांनी निर्माण केला होता. केंद्र सरकारच्या मिनीस्ट्री आहे. त्यांनी मागे आरोप केला होता की ऑनलाईन एवढं स्वस्त आहे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी महागात घेतले असा आरोप दमानिया यांनी केला होता, दमानिया याचं ढोंग उघडं पडलं आहे. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा हा प्रकार आहे. जे ऑनलाईन दमानिया यांना मिळू शकत नाही, ते आमच्या शेतकऱ्यांना कसं मिळणार ? असा सवाल एड.गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की हा कृषीप्रधान देश आहे. या देशात शेतकऱ्यासोबत चुकीचं होता कामा नये. अंजली दमानिया यांना वैचारिक रसद मिळून मॉड्यूलप्रमाणे त्या बोलत आहेत. असं भुकणाऱ्यांवर कुणी लक्ष देणार नाही. आज अंजली दमानिया यांचं पितळ उघडं पडलं आहे. पडदे के पिछे कोण है आणि क्या है ? हे अंजली दमानिया यांना विचारावं. ऑनलाईनमध्ये फसवणूक मिळते स्वस्त मिळत नाही असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.
तो अधिकारी ठाकरेंच्या प्रेमातला
एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे कापले जातात, परंतू ते पीएफ अकाऊंटला जमा होत नाही. एसटीतील कर्मचाऱ्यांचे पैसे कापले जात आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून ते पैसे दिले जात नाही
दोन्ही पैसे न देणं आणि पीएफचे पैसे न भरणे ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे. गिरीश देशमुख नावाचे अधिकारी जे ठाकरेंच्या प्रेमातले आहेत. पैसे न देणं चिटिंग आहे, ते दिले जात नाहीत.
ही बाब आम्ही प्रताप सरनाईक यांना त्यांच्या बंगल्यावर भेटलो. पण अधिकाऱ्यावर परिणाम होत नाही. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन अटक झाली पाहिजे अशी मागणी मी करतो असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List