काखेतील काळे डाग घालवण्यासाठी करुन बघा भन्नाट घरगुती उपाय, महागडी प्रोडक्ट्स होतील फेल
स्क्रब मास्क
साहित्य
3-4 चमचे नारळ तेल
1 टीस्पून टूथपेस्ट
1 टीस्पून बेकिंग सोडाएका भांड्यात ३-४ चमचे खोबरेल तेल घ्या. आता त्यात टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा घाला. ते चांगले मिसळा. तयार केलेला मास्क काखेत काळ्या भागावर लावावे. सुमारे 10-15 मिनिटे मास्क ठेवा. हलके ओले झाल्यावर हलक्या हातांनी घासून पाण्याने स्वच्छ धुवा. स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.
टीप: बेकिंग सोडा एक उत्तम एक्सफोलिएट आहे, यामुळे काखेतील काळेपणा कमी होतो.

टोनिंग मास्क
साहित्य
कप बेसन
1 टीस्पून तांदळाचे पीठ
1 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून मध
1 टीस्पून दूध
एका वाडग्यात सर्व साहित्य नीट मिक्स करुन घ्या. सर्व मिश्रण फेटून चांगले मिक्स करा. तयार केलेला मास्क काखेत लावावा. किमान 10 ते 15 मिनिटे हा मास्क तसाच ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा.

डाळींचा स्क्रब
साहित्य
लाल मसूर पेस्ट किंवा मसूर डाळ
लिंबाचा रस
कप दूध
पद्धत
मसूराची पेस्ट एका भांड्यात घेऊन, त्यात लिंबाचा रस घालावा. यामध्ये दूध घालून, नंतर चांगले मिसळून घ्यावे. काखेत हा मास्क लावून किमान 10 ते 15 मिनिटे हा मास्क तसाच ठेवावा. नंतर थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
टीप: मसूर डाळ एक उत्तम ब्लीचिंग एजंट आहे.
अॅलोव्हेरा जेल मास्क
साहित्य
कोरफड जेल किंवा मॉइश्चरायझर
पद्धत
तुमच्या काखेत एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा. 5-10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर धुवून
स्वच्छ पुसून घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List