बैठकीपूर्वी कॅबिनेटचा अजेंडा बाहेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, मंत्र्यांना कारवाईचा स्पष्ट इशारा
CM Devendra Fadnavis Angry: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी आपल्याच मंत्र्यांवर संतापले. मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वी बैठकीचा अजेंडा बाहेर येत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. त्यांनी या बाबत आपल्या सहकारी मंत्र्यांना जाहीरपणे कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्री येथेच थांबले नाही त्यांनी गुप्ततेच्या शपथेची आठवणही मंत्र्यांना करुन दिली. त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही तर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
काय म्हणाले मुख्यमंत्री
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ बैठक होण्याचा अजेंडा छापणे चुकीचे आहे. बैठक होण्यापूर्वी काही लोक अजेंडा छापत आहे. याबाबत मी मंत्र्यांनाही सांगितले आहे. मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्याचे सांगितले पाहिजे. अन्यथा मला कारवाई करावी लागले. हा अजेंडा गुप्त असतो. त्या गुप्ततेची शपथ आपण घेतली आहे. तसेत माध्यमांनी सुद्धा आपल्या खपासाठी आणि टीआरपीसाठी नियम मोडू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार
कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील घरांचा विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले. या ठिकाणी बोगस महारेरा प्रकरणातील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कल्याण डोंबिवली संदर्भात मी स्वत: बैठक घेत आहे. या ठिकाणी गरजू लोकांची घरे कशी वाचवता येईल, त्याचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रवींद्र चव्हाण यांनी घटना लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर संबंधित बिल्डरवर कारवाई करा, असे आदेश आपण पोलिसांना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्या ठिकाणी काही इमारती सरकारी जागेवर बांधल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वैद्यकीय कक्ष स्थापन केला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय कक्ष मी पण चालवात होतो. त्यात चुकीचे काही नाही. उपमुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या वैद्यकीय कक्षात काहीही गैर नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List