पाळीमध्ये तुमच्याही ओटीपोटामध्ये दुखते का! पाळीतील पोटदुखीवर घरी असलेला गूळ आहे खूप गुणकारी.. वाचा
सध्याच्या घडीला साखरेपेक्षा उत्तम पर्याय गूळ मानला जातो. साखरेपेक्षा कधीही गूळ खाणे हे हितकारक मानले आहे. पूर्वीच्या काळी घरी पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर पाण्याचा तांब्या आणि गूळाची वाटी देण्याची प्रथा होती. आज ती प्रथा लुप्त झाली. गूळ हा उष्ण असला तरी, शरीरास थंडावा देण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. म्हणूनच पूर्वीच्या काळी बाहेरून आलेल्या पाहुण्यांना गूळ पाणी देण्याची पद्धत होती. कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसलेला गूळ हाऔषधापेक्षा कमी नाही असे म्हटले जाते. केसांसाठी असो अथवा त्वचेसाठी असो, गूळ खाण्याचे खूप फायदे आहेत.
गूळ खाल्ल्यामुळे त्वचा कोमल आणि निरोगी बनते. केस देखील चांगले होतात. त्याच बरोबर मुरूम देखील बरे होतात.
ज्या स्त्रियांना पीरियड्स वेदनादायक असतात, त्यांनी गूळ नक्कीच खायला पाहिजे. पीरियड्स प्रारंभ होण्याच्या एक आठवड्या आधीपासून दररोज 1 चमचा गुळाचे सेवन करायला पाहिजे.
गर्भवती महिलांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्यांना अशक्तपणा येणार नाही आणि ऍनिमिया देखील होणार नाही. ऍनिमियामुळे स्त्रिया लवकर थकतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवतो.
दररोज एका ग्लास दुधात थोडे गूळ मिसळून प्यायल्याने नक्कीच फायदा होतो. थकवा दूर करण्यासाठी दिवसातून तीन वेळा तीन चमचे गूळ दररोज खायला पाहिजे.
आपल्याला दम्याचा त्रास असेल तर घरी गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवून खा आणि त्यानंतर एक ग्लास दूध घ्या.
साखरेऐवजी दूध किंवा चहामध्ये गूळ घातला तर लठ्ठपणा वाढत नाही कारण साखर वापरल्याने आपण लठ्ठ होण्याची शक्यता असते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List