बायोमेडिकल कचऱ्याचा रस्त्यावर ढीग, कल्याणच्या वृंदावन रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

बायोमेडिकल कचऱ्याचा रस्त्यावर ढीग, कल्याणच्या वृंदावन रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

रुग्णालयांमधून निर्माण होणारा बायोमेडिकल कचरा हा नागरी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र कल्याणमधील वृंदावन रुग्णालय बायोमेडिकल कचरा रस्त्यावर फेकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कचऱ्याच्य ढिगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयच नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली पालिकेने रुग्णालय प्रशासनाला 13 हजारांचा दंड ठोठावला आहे. केडी एमसी कडून सातत्याने सूचना देऊनही काही रुग्णालयांकडून बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वृंदावन रुग्णालयाकडून वापरलेली इंजेक्शन, आयव्ही बॉटल, काढलेले प्लास्टर, कापूस, बँडेज, वापरलेल्या आणि न वापरलेल्या सीरिंज असा अत्यंत धोकादायक कचरा रस्त्यावर टाकला होता. कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली होती. रात्रीच्या वेळी स्वच्छता मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी हा प्रकार उघड केला. यामुळे वृंदावन रुग्णालयाला 13हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.

सर्व हॉस्पिटलची झाडाझडती

रुग्णालयीन कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी केडीएमसीने उंबर्डे येथील बायोमेडिकल वेस्ट प्लाण्टची व्यवस्था केली आहे. तरीही काही रुग्णालये बेजबाबदारपणे हा कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी केडीएमसीने पुन्हा एकदा सर्व रुग्णालयांना नोटीस बजावून बेजबादारपणा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Upcoming bikes in March – मार्चमध्ये लॉन्च होणार ‘या’ 3 पॉवरफुल बाईक्स, पाहा लिस्ट Upcoming bikes in March – मार्चमध्ये लॉन्च होणार ‘या’ 3 पॉवरफुल बाईक्स, पाहा लिस्ट
नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मार्च महिना खूप चांगला ठरू शकतो. रॉयल एनफील्डपासून ते टीव्हीएस मोटरपर्यंत दुचाकी उत्पादक कंपनी आपली नवीन...
सत्तेसाठी आश्वासनांचा पाऊस पाडत महायुतीने शेतकरी आणि मच्छिमारांना फसवले, काँग्रेसचे रत्नागिरीत आंदोलन
‘संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे फोटो समोर… मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर होताय ? या घटकाची असू शकते कमतरता, तज्ज्ञांकडून माहीती जाणा
काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान कार्यकत्यांनीच नेत्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख हत्येचे भयावह फोटो व्हायरल…अजून किती पुरावे हवे? जनतेचा सवाल
फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर