त्वचा उजळण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी केळ्याची साल आहे गुणकारी.. वाचा
आपण सर्व केळी घेतो, खातो आणि केळीची साल फेकून देतो. तुम्हीही हे करत असाल तर आता करू नका. कारण केळी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी त्याची साल देखील तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकते. केळीच्या सालीने तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. केळीच्या सालीमुळे पिंपल्सची समस्या दूर होते. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी-6, बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.
केळ्याची साल आपण चेहऱ्याला लावण्याचे खूप सारे फायदे आहेत. केळीची साल चेहऱ्याला लावताना सर्वात आधी चेहरा धुवून घ्यावा.
प्रथम आपला चेहरा क्लिंजरने स्वच्छ करा आणि पुसून टाका.
10 मिनिटे सालाच्या आतील भागाने चेहऱ्याला मसाज करा
सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर चेहरा धुवा.केळीच्या सालीत फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवून तुमची त्वचा निरोगी बनवते. मुरुमांमुळे चेहऱ्यावरील लाल ठिपके कमी होतात. यासोबतच पुढील मुरुमे येण्यापासून देखील प्रतिबंधित करते. याशिवाय, केळीच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
केळी खाऊन आपण पटकन त्याची साल केराच्या टोपलीत फेकतो. केळी आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असताना, त्याचे सालसुद्धा आपल्यासाठी उपयुक्त आहे हे आता अजिबात विसरू नका. त्यामुळे आता केळीच्या सालीला केराची टोपली अजिबात दाखवु नका.
केळीच्या सालीच्या माध्यमातून आपण त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
केळीच्या सालीमुळे आपला मुरुमांचा त्रास दूर होतो. मुख्य म्हणजे केळीच्या सालीत व्हिटॅमिन बी -6, बी -12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाण खुप असते. त्यामुळे त्वचेसाठी खुप उत्तम मानले जाते.
केळीच्या सालीचा वापर करुन अगदी साधे सोपे उपाय आपण घरबसल्या करु शकतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List