कुलाबा किल्ल्यावर आता चला रोप वेने
गार वारा… डोळे भिरभिरतील असा अथांग समुद्र… उंच उडणारे पक्षी… याचा अनुभव घेत पर्यटकांना कुलाबा किल्ला पाहण्यासाठी जाता येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अलिबाग सुमद्रकिनारपट्टीपासून कुलाबा किल्ल्यापर्यंत रोप वे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकाने मंजुरी दिली आहे.
कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक गणपतीचे मंदिर हे अलिबागकरांचे आराध्य दैवत आहे. मात्र हे मंदिर अरबी समुद्रात असणाऱ्या कुलाबा किल्ल्यात स्थित आहे. हा किल्ला अलिबागच्या किनाऱ्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी समुद्राला ओहोटी आल्यानंतरच जाता येते. त्यामुळे किनाऱ्यापासून किल्ल्यात जाण्यासाठी रोप वेची उभारणी करण्यात येणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेंतर्गत राज्यातील एकूण ४५ देवस्थानांवर जाण्यासाठी रोप वे उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे
कनकेश्वर मंदिरातही जाणे सोपे
कनकेश्वर देवस्थानच्या दर्शनाला जाण्यासाठीचा मार्ग सोपा झाला आहे. मापगाव येथील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वृद्ध, महिला, लहान मुलांना दर्शनासाठी जाता येत नाही. त्यामुळे कनकेश्वर मंदिरात जाण्यासाठी रोप वे उभारण्यात येणार आहे. कनकेश्वर येथील रोप वेची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची तर समुद्रकिनाऱ्यावरील रोप वेची जबाबदारी अलिबाग नगर परिषदेची आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List