रामलल्लाच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला, हँड ग्रेनेडसह एक संशयित अटक
अयोध्येतील राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यास सुरक्षा दलाला यश आले आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला दोन हँड ग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल रहमान असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या संपर्कात होता. रहमान फिरोजाबादमध्ये एक मटण शॉप चालवत होता. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, राममंदिरच्या निर्मितीनंतर आयएसआय हिंदुस्थानात मोठा घातपात घडवण्याचा कट रचत होता. यात अयोध्येतील राम मंदिराचाही समावेश होता.
अब्दुल रहमानने याआधीही अनेकदा राम मंदिराची रेकी केली असल्याचे तपासात समोर आले आहे. रहमानने सर्व माहिती आयएसआयला पुरवल्याची माहिती मिळते. राम मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.
हे ऑपरेशन सुरळीत पार पाडण्यास गुजरात एटीएसने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. एक संशयित दहशतवादी हिंदुस्थानात घुसला असून घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरीदाबाद एसटीएफने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List