Latur: कारची धडक बसताच बाइक 50 फुट दूर फेकली गेली; एक जण जागीच ठार
अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील श्री साई पेट्रोल पंपा समोर भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी कारने दुचाकीला दि 2 मार्च रोजी सायंकाळी 05:30 वाजता जोराची धडक दिली यात दुचाकी वरील इसमाचा जागीच मृत्यु झाला. अहमदपूर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत अपघाताच्या घटनेची नोंदीची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार पालम तालुक्यातील बनवस येथील ज्ञानोबा मधुकर सुरनर वय 42 वर्ष हा इसम अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील श्री साई पेट्रोल पंपा समोरील धाब्यावर जेवण करून अहमदपूर कडे काही कामानिमित्त आपली दुचाकी क्र एम.एच 22 डब्ल्यु 1201 घेऊन निघाला असता नांदेड कडून अहमदपूर कडे हुंडाई कंपनीची एक्सटर गाडी क्रमांक एम.एच 22 बि. सि 1702 ही भरधाव वेगाने येत होती. त्यातच दुचाकी वरील इसम ज्ञानोबा सुरनर हा श्री साई पट्रोल पंपा समोरील झेब्रा क्रॉसिंग पास करून अहमदपूर कडे येत असताना पाठीमागून दि 02 मार्च रोजी सायंकाळी 05:30 वाजता जोराची धडक बसली असून या धडकेत दुचाकी जवळ पास पन्नास फुट लांब उडून रस्त्याच्या बाजूस जाऊन पडली यात दुचाकीवरील ज्ञानोबा सुरनर याचा जागीच मृत्यु झाला. असून अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयातील शवगृहात त्याचा मृत देह ठेवण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List