Chandrapur News प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून जीवन संपवले
प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (25) आणि 14 वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपविली.
उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. ती भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहून नववीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी वसतिगृहातून ती घरी आली होती. तिचे वडील मजुरीला तर आई घरकामात व्यस्त असताना रोहित हा सकाळी दुचाकीवर तिच्या घरासमोर आला. घराबाहेर बोलावून तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र बंद आढळून आला. त्यामुळे ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार केली. उचली शिवारातील वीज टॉवरला गळफास लावून अज्ञात युवक-युवतीने आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर मृतक प्रेमीयुगुलाची ओळख पटली. पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबीयांना बोलावून पंचनामा केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस निरीक्षक करीत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List