कृषीमंत्री माणिकाराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी? अंबादास दानवे यांनी पहिल्याच दिवशी विचारला प्रश्न
माणिकाराव कोकाटे यांना कोर्टाने सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. असे असले तरी त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला. याबाबत सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणी दानवे यांनी केली.
अंबादास दानवे म्हणाले की, कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाली असून या शिक्षेला कुठलीही स्थिगिती दिलेली नाही. यावर सरकारची भूमिका काय आहे? या प्रश्नांवर तालिका अध्यक्ष म्हणाले की, माणिकराव कोकाटे हे कनिष्ठ सभागृहाचे आहेत. त्यामुळे या विषयसुद्धा खालच्या सभागृहात मांडला जाईल. त्यावर दानवे म्हणाले की एका मंत्र्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे त्यामुळे हा विषय कुठल्याही विशिष्ट सभागृहाचा होणार नाही.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांच्याबाबत कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. त्यांची ऑर्डर हाती आल्यानंतर राज्यपाल किंवा सभागृह यावर निर्णय घेईल असे फडणवीस यांनी नमूद केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List