Saif Ali Khan Attack : वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर? 10 दिवसांपूर्वी काय घडलं, सैफ प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर
बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसलेल्या चोरट्याने त्याच्यावर धारधार चाकूने हल्ला केल्याने सैफ गंभीर जखमी झाला. बुधवारी मध्यरात्री घडलेली ही घटना, काल, गुरूवारी सकाळी उघडकीस आली आणि प्रचंड खळबळ माजली. या हल्ल्यात सैफ अली खान तसेच त्याच्या घरातील एक केअरटेकर जखमी झाली. दोघांवरही लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. सैफवर तर 6 वार झाले होते, त्यापैकी 2 जखमा खोलवर असून त्याच्या मणक्याजवळही वार झाला होता. त्याच्यावर काल लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्सब्लेडचा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून वांद्रे सेफ आहे का असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे.
याचदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. बांद्राच्या एका सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षकला धमकवणाऱ्या चोराचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ही घटना गेल्या आठवड्यातच म्हणजे 12 जानेवारी रोजी घडली होती. त्या दिवशी वांद्रे येथील वांद्रे येथील स्कायपर टॉवर सोसायटीत हा प्रकार घडला. सैफ अली खानच्या इमारतीमध्ये घडलेल्या घडनेसारखीच ही घटना असून तेथेही एक चोर सोसायटीमध्ये घुसला होता.
चोराने सुरक्षारक्षक आणि सोसायटी मालकाला धमकावलं
सैफ अली खानवर चोरट्याने हल्ला केल्याच्या घटनेप्रमाणेच वांद्रे येथील आणखी एका सोसायटीत एका चोरट्याने सुरक्षारक्षक आणि सोसायटीच्या मालकाला धमकावल्याची घटना समोर आली आहे. वांद्रे पश्चिम येथील हायप्रोफाईल सोसायटीत राहणारा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे. मात्र ही एकमेव घटना नाही तर वांद्रे येथील इतर अनेक सोसायट्यांमध्ये अशाच प्रकारच्या चोरीच्या आणि धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत.
वांद्रे पश्चिम येथील इम्रान कुरेशी यांच्या स्कायपर टॉवर सोसायटीतील हा सीसीटीव्ही आहे. इम्रान कुरेशींनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी दोन जण चोरीच्या उद्देशाने त्यांच्या सोसायटीत घुसले होते. तेव्हा सुरक्षा रक्षक त्यांना पकडण्यासाठी गेले असता, दोघांपैकी एक जण पळून गेला तर दुसरा पकडला गेला. यानंतर आम्ही तातडीने 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले, अर्ध्या तासानंतर पोलीस आले आणि आम्ही आमच्या सुरक्षा रक्षकाने पकडलेल्या चोराला वांद्रे पोलीस ठाण्यात पाठवले, असे कुरेशी यांनी नमूद केलं. त्यामुळे वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर आहेत का असा सवाल उपस्थित होत असून सुरक्षा-व्यवस्थेबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिस नोंदवणार करीनाचा जबाब
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी लवकरच करीना कपूरचा देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्याने आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का ? यासाठी करीनाचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झाला होता . त्यामुळे तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे, असे समजते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List