सेल सुरू होण्याआधीच iPhone 15 ची किंमत घसरली, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. रिपब्लिक डे सेल फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर लवकरच सुरू होणार आहे. पण हा सेल सुरू होण्याआधीच iPhone 15 च्या 256GB व्हेरिएंटच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आता कमी किमतीत हा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
Apple चा iPhone 15, जो 2023 मध्ये लॉन्च झाला होता, तो आता Amazon वर मोठ्या सूटसह उपलब्ध आहे. याचा 256GB व्हेरिएंट सध्या 89,600 रुपयांऐवजी फक्त 71,900 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Amazon सध्या यावर 20 टक्के सूट देत आहे.
याशिवाय तुम्ही हा फोन EMI पर्यायाद्वारे देखील खरेदी करू शकता. हा फोन तुम्हाला 3,237 रुपये प्रति महिना EMI वर मिळू शकतो. याशिवाय Amazon तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात एक्सचेंज ऑफर अंतर्गत 22,800 रुपयांपर्यंत सूटही देत आहे.
iPhone 15 प्रीमियम डिझाइन आणि मजबूत परफॉर्मन्ससह डिझाइन करण्यात आला आहे. याची डिझाइन ॲल्युमिनियम फ्रेम आणि ग्लास बॅक पॅनेलने सुसज्ज आहे. यात HDR10+ सह 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आणि यात 2000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळते.
हा फोन Apple A16 बायोनिक चिपसेटसह येतो. हा फोन बॉक्सच्या बाहेर iOS 17 वर चालतो. तसेच हा 6GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज पर्यायासह येतो. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP प्रायमरी आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List