अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती गंभीर असल्यचे बोलले जात आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीत कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेचे टीकू तलसानिया यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण चाहतावर्ग त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. टीकू तलसानिया यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते टीकू तलसानिया यांचा जम्न 1954 मध्ये झाला. आता सध्या टीकू 70 वर्षांचे असून 1984 साली टेलिव्हिजन शो ‘ये जो है जिंदगी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अवघ्या दोन वर्षातच म्हणजे 1986 साली त्यांनी ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’, ‘असली नकली’ या चित्रपटांमध्ये दिसून आलए. त्याच प्रमाणे ‘बोल राधा बोल’, कुली नंबर 1’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हीरो नंबर 1’, ‘बडे मिया छोटे मिया’ ‘विरासत’ व ‘हंगामा 2’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा
एकीकडे दिल्ली विधानसभांचा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असताना आता शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला मोठा...
ठाकरे गटाचे एक घाव, दोन तुकडे… स्वबळाचा नारा होताच काँग्रेस बॅकफूटवर? नेत्यांनी काय काय म्हटलं?
बेस्ट चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेला अन् बसने पकडला वेग, कुर्लाच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा थरार
2000 कोटींची कमाई,आमिर खानसोबत लग्नाच्या अफवा अन् रातोरात स्टार; अभिनेत्रीची चर्चा फारच
उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्थानकावर छत कोसळलं, अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई
वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी