मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊत यांची घोषणा
आगामी काळात मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि पक्षवाढीला बळ मिळावे म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचेच आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List