देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर यांची मागणी

देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर यांची मागणी

मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्यात यावा,अशी मागणी केली आहे. खटला फास्टट्रॅकवर चालवत वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या. त्याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने आक्रोश मोर्चा धाराशिवमध्ये काढण्यात आला आहे. आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत. ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही? या गोष्टीची चिड येते की नाही? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.

या वृत्तीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठलीच शिक्षा असू शकत नाही, अशी माणसं समाज व्यवस्थेत जगायच्या लायक नाहीत, त्यांना तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारचे आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांगितले.

3 जून 2006 ला माझ्या वडिलांची हत्या झाली, आज अठरा वर्ष झालेत, अजूनही प्रकरण ट्रायल कोर्टात आहे. या वृत्तीला जर धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टाकडे चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे. आज कुठल्याही समाजाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो. ही जात नसते तर वृत्ती असते. याचे काय कारण आहे? त्यांना वाटत असतं मी पदावर आलो, आमदार, मंत्री झालो, माझ्या पक्षाचे सरकार तिथे आले आहे. दोन-तीन टर्म झाल्यावर त्या माणसाला मस्ती चढते, त्यांना वाटतं की सगळंच आपल्या हातात आहे. दोन-तीन खून केले तरी आम्ही पचवू शकतो. त्यामुळे त्या माणसाला आत्मविश्वास येतो आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात. हा आत्मविश्वास जो माणूस देत आहे, या वृत्तीचा नायनाट करणे गरजेचे आहे. ही वृत्ती कुठल्याही समाजात असेल, तरी त्याच ठिकाणी ठेचून माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतून संपवणे गरजेचे आहे, असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट