Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा

Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा

दापोली तालुक्यातील दमामे (वडाची वाडी) येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून गरिब शेतकऱ्याच्या 6 बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवली आहे. त्यामुळे गायी, वासरे, गुरांसह बकऱ्यांना बिबट्याने लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शुक्रवारी 10 जानेवारी ते शनिवारी 11 जानेवारी दरम्यान मध्यरात्री दमामे (वडाची वाडी) येथील रहिवासी अंबाजी हरावडे यांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने 10 बकऱ्यांपैकी सहा बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. या बकऱ्यांपैकी एका बकरीला घेऊन जाण्यात बिबट्या यशस्वी झाला आहे. सकाळी बकऱ्यांना पाला चारण्यासाठी गोठ्यात गेले असता सुभाष हरवडे यांना धक्काच बसला. घडल्या घटनेची खबरदारी घेऊन वन विभाग प्रशासनाने पिंजरा लावून बिबटयांना पकडून दुर अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासात सोडून त्याच्या सुरक्षिततेसह येथील रहिवाशांमध्ये निर्माण झालेली भिती दुर करावी, अशी मागणी दमामे तोमोंड गावचे उपसरंपच गंगाराम हरावडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार? मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उभी फूट पडली...
राज्यातील राजकारणातील मोठी बातमी, आता शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा
तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरवर आदळली भरधाव कार; एकाचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यातील एक कोटी 15 लाख रुपयांच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक; लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
IND VS ENG – इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधार; मोहम्मद शमीचे कमबॅक
आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार