गौरी लंकेश यांच्या खुनातील सर्व आरोपी तुरुंगाबाहेर, आणखी एका आरोपीला जामीन मंजूर
पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनातील आरोपील शरद काळसकरला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. लंकेश यांच्या खुनात 18 आरोपी होते. त्यापैकी काळसकरलाही जामीन मिळाल्याने सर्व आरोपी तुरुंगातून बाहेर आहेत तर काही आरोपी अद्याप फरार आहेत.
5 सप्टेंबर 2017 रोजी दोन जणांनी दुचाकीवर येऊन गौरी लंकेश यांना गोळ्या घातल्या होत्या. या खुनाप्रकरणी 18 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी 18 वा आरोपी विकास पाटील हा तेव्हापासून फरार आहे. काळसकरवर आधीच नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा आरोप आहे. त्यामुळे सरकारी पक्षाने काळसकरच्या जामीन अर्जाला विरोध केला. पण कोर्टाने काळसकरला जामीन मंजूर केला. तसेच एवढ्या काळासाठी आरोपीला तुरुंगात ठेवणे हे त्याच्या संविधानात्मक हक्काचे उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हटले.
2023 साली कर्नाटक उच्च न्यायालयाने लंकेश यांच्या खुनातील आरोपींची जामिनावर सुटका केली होती. एन मोहनला सर्वात पहिल्यांदा जामीन मिळाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन तसाच ठेवला. त्यानंतर भरत कुरणे, श्रीकांत पांगरकर, अमित दिघवेकर, केटी नवीन कुमार आणि सुरेश एच.एल या आरोपींना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जामीन मिळाला. त्यानंतर बंगरुळू कोर्टाने आठ आरोपींना जामीन मंजूर केला. या आरोपींची सुटका झाल्यानंतर त्यांच्या गावी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले गेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List