मुंबईतील कुर्ल्यात एका हॉटेलला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली
मुंबईतील कुर्ला पश्चिमेतील रंगुन जायका हॉटेलला भीषण आग लागली आहे. हे हॉटेल एलबीएस मार्गावर आहे. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. आगीचे नेमेक कारण अद्याप समजलेले नाही.
मुंबईत आग लागण्याच्या अनेक घटना घडत आहे. आता त्यात कुर्ल्यातील हॉटेलच्या घटनेचीही भर पडली आहे. कुर्ला येथील रंगुन जायका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर हॉटेल परिसरात गोंधळ उडाला आणि एकच धावाधाव झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी आजूबाजूचा परिसरात रिकामा केला. परिसरात बघ्यांची गर्दी झाली असून गर्दीला पांगवण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List