मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरवर आदळली भरधाव कार; एकाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील हातखंबा जवळ एका भरधाव कारने ट्रेलरला मागून धडक दिली. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 4 च्या सुमारास रत्नागिरीहून हातखंबा जवळ ट्रक गोव्याहून नवी मुंबईकडे होता. यावेळी मागून येत असलेल्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर ( रा. मुंबई गंभीर) जखमी झाला. घटनेची माहिती कळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List