Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांची हत्या दीड कोटीसाठी, आकाच मेन सूत्रधार; धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चात सुरेश धस यांचा मोठा दावा

Santosh Deshmukh Case – संतोष देशमुखांची हत्या दीड कोटीसाठी, आकाच मेन सूत्रधार; धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चात सुरेश धस यांचा मोठा दावा

बीडमधील केज तालुक्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा आरोप केला. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटीसाठी झाली, असे सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येमागे आकाच मेन सूत्रधार आहे, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.

आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग चार तास मारलं. याचना करतो विनंती करतो, तुमची नावं कोणाला सांगणार नाही, मला मारू नका. मला पाणी पाजा… पाणी पाजा म्हटल्यावर ह्यानी दुसरं काहीतरी पाजलं. ज्याचा उल्लेख मी इथे करू शकत नाही जिथे माझ्या माय माउल्या बसलेल्या आहेत. संतोष धायमोकलून रडत होता. त्याचे व्हिडिओ काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. आणि तिकडून आका सांगत होता बहोत अच्छे मार रहे हो और मारो. तुम्हाला पैशांचा माज आलाय, असा हल्ला सुरेश धस यांनी चढवला.

‘आका बरोबर त्याचा आका पण बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे’

अवादा कंपनीने फिर्याद दिली होती. यांची फिर्याद घेऊ नका म्हणून एका माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आला. एसआयटी आणि पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की, ज्याने कोणी फोन केला यांची अ‍ॅस्ट्रॉसिटी घेऊ नका, खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो यांच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. गुन्हा दाखल करू नका असं म्हणणाराच मुख्य आरोपी आहे. आकाचं आणि त्याच्या आकाचं बोलणं झालं असेल तर आका बरोबर त्याचा आका पण बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

सातजणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्का लागला पाहिजे. 302 मध्येही आका आहे. आका म्हणतो माझा संबंध नाही. पण तोच सूत्रधार आहे. तूच तर मेन आहे. आणि वरचा आका… 19 ऑक्टोबरला स्वतःच्या सातपुडा बंगल्यावर ज्या मंत्र्याने बैठक घेतली तो यातला आरोपी नाही, हे कसं? पोलिसांनीच मला समजून सांगावं? संतोष देशमुखांची हत्या राहिलेल्या दीड कोटीसाठी झाली. 50 लाख यांनी निवडणुकीतच घेतले होते. दीड कोटी राहिले होते. वाल्याकाका आम्हाला सांगायचं ना, दीड नाही तीन कोटी गोळा करून आमच्या संतोषसाठी आम्ही दिले असते, असे सुरेश धस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट