संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थिति लावली. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ”शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आगामी काळात चांगले दिवस आपण आणू, असा मला विश्वास आहे.”
अंबादास दानवे म्हणाले की, ”छत्रपती संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, क्रांतीज्योती सवित्राबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बसविले.” ते म्हणाले, ”शिवसेना पक्षाच्या या मेळाव्यात भरारी घेण्याचे आपल्याला ठरव्याचे आहे. आगामी काळात जनसामानचे शासकीय व निमशासकीय पातळीवरील काम ताकदीने करायचे आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List