एआयच्या मदतीने हजार नोकऱ्यांसाठी अर्ज केला अन् झोपून गेला
सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा ट्रेंड येतोय. एआयने सर्वच क्षेत्रांत शिरकाव केलाय. अगदी तुमच्या रोजच्या कामावरही एआयचा प्रभाव दिसत आहे. एका इसमाने एआयच्या ताकदीचा वापर करत रात्रभर एक हजारापेक्षा अधिक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि तो चक्क झोपून गेला. सकाळी उठून बघतो तर काय, चक्क 50 कंपन्यांमधून त्याला मुलाखतीसाठी बोलावणं आलं होतं. एआयची करामत बघून तो इसम थक्क झाला. अर्ज करण्यासाठी एआय बॉटची मदत घेतल्याचे त्याने सांगितले. एआय बॉट पूर्णपणे स्वयंचलित आहे. नोकरीच्या स्वरूपानुसार उमेदवारांचा बायोडेटा आणि कव्हर लेटर तयार करणे, अशी कामे एआय बॉट करते. एआय बॉटच्या माध्यमातून प्रत्येक जॉबसाठी अनुकूल असा अर्ज केल्याने प्रोफाईल अधिक आकर्षक बनते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List