विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहिला, गर्लफ्रेंडची हत्या करून 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला!
मध्य प्रदेशच्या देवासमध्ये एका फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची 10 महिन्यांपूर्वीच हत्या झाली होती. ही महिल्या आपल्या लीव्ह इन पार्टनरसोबत त्या खोलीत राहत होती. त्याच पार्टनरने मित्राच्या मदतीने महिलेची हत्या केली आहे. या प्रकरणी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणीत आरोपीला मदत करणाऱ्या मित्राला आधीपासूनच इतर गुन्ह्यांच्या आरोपाखाली राजस्थानच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
देवास शहरातील बायपास रोडजवळ असणाऱ्या वृंदावन धाम कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. बाजूच्या खोलीतून अतिशय दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. यावेळी या घटनेचा खुलासा झाला. वृदांवन धाम कॉलनीतील रुम मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै 2023 मध्ये त्यांची खोली संजय पाटीदार यांना भाड्यावर दिली होती. यानंतर संजय जून 2024 पर्यंत त्या खोलीत राहिला. येथे तो आपली मैत्रिण प्रतिभा (पिंकी प्रजापति) हिच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होता.
प्रतिभा आणि आरोपी संजय 5 वर्षांपासून एकत्र राहत होते. यातील तीन वर्ष प्रतिभा आणि संजय उज्जैनमध्ये राहिले. यानंतर संजय प्रतिभाला देवासमध्ये घेऊन आला. पाच वर्षांपासून एकत्र राहत असल्याने प्रतिभाने संजयसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संजय विवाहीत असल्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभाचे बोलणे टाळायचा. प्रतिभाच्या सततच्या तक्रारीमुळे संजय वैतागून गेला होता. त्यामुळे त्याने प्रतिभाची हत्या करण्याचा कट रचला.
संजयने त्याचा इंगोरियामध्ये राहणाऱ्या विनोद दवे नाव्याच्या मित्रासोबत मिळून प्रतिभाची हत्या केली. मार्चमध्ये संजयने लग्नाच्याच वादातून प्रतिभाचा गळा आवळला. आणि मृतदेह घरातील फ्रीजमध्ये भरून ठेवला. यानंतर फ्रीजला देखील कपड्याने बाधून ठेवला. आणि खोली बंद करून तेथून निघून गेला. यानंतर तो बऱ्याचदा खोलीवर आला होता. मात्र तेथे राहत नव्हता. अखेर जून 2024 मध्ये संजय खोली सोडून निघून गेला. मात्र पीडित प्रतिभाचा मृतदेह बरेच महिने घरातच असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली होती. शेजारच्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी खोलीची पाहणी केली. यावेळी त्यांना फ्रीजमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांना आरोपी संजयबाबत माहिती मिळाली. शेजारच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी संजयला उज्जैनमधून अटक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List