लग्नानंतर महिन्यातच पतीचा मृत्यू; पत्नीची आत्महत्या, सांगोल्यामधील वाढेगावातील घटना

लग्नानंतर महिन्यातच पतीचा मृत्यू; पत्नीची आत्महत्या, सांगोल्यामधील वाढेगावातील घटना

पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीच ओढणीच्या साहाय्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे गुरुवारी (दि. ९) पहाटे घडली. अनिता निखिल घोंगडे (वय – 23) असे विवाहितेचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यात ही घटना घडल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, मंगळवारी (दि.7) निखिलचे अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निःशब्द

होती. बुधवारी निखिल याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीय आणि अनिता असे सर्वजण घरात झोपले होते. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्राशेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

दरम्यान, घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता न दिसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, तिने पत्राशेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी तिला खाली उतरवून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सांगलीतील मिरज तालुक्यातील मालगाव येथील निखिलची आत्या वंदना शिरसावड यांची अनिता ही मुलगी होय, तर निखिल मामा दिगंबर घोंगडे यांचा मुलगा होता. अनिताला मामाच्या मुलाशी लग्न करायचे होते, त्यामुळे घरातील नातेसंबंधांमुळे 5 डिसेंबर रोजी दोघांचा विवाह झाला होता. मात्र, अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.

निखिलला मिळाले होते जीवनदान

निखिल घोंगडे याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी मुलगा निखिल यास देऊन त्याचे मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करून जीवनदान दिले होते. त्यानंतर तो व्यवस्थित होता. त्याचा 5 डिसेंबर रोजी विवाह झाला. लग्नानंतर 6 जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून पुन्हा जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्या ठिकाणी न्यूमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचे निदान झाले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Congress : देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? तिकडे काय संजय राऊत आहे का?; राऊत यांचा विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल Congress : देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? तिकडे काय संजय राऊत आहे का?; राऊत यांचा विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल
महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून खटक्यामागून खटके उडत आहेत. तीनही पक्षांचे नेते तीन दिशेला तोंड करून आहेत. आता ते एकमेकांना...
महाविकास आघाडीत भूकंप… महाफूट! ये तो होना ही था… भाजपची एका वाक्यात प्रतिक्रिया; काँग्रेस नेते काय म्हणाले?
Sanjay Raut : ‘मी मोदींना देव मानतो’, संजय राऊतांच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया, ही कोपरखळी की खरंच केली स्तुति?
BJP : मिनी मंत्रालयासाठी भाजपाची मोर्चे बांधणी; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी फुंकले रणशिंग
Amitabh Bachchan : उंचपुरे अमिताभ बच्चन ‘पा’मध्ये लहान होतात तेव्हा… दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
कर्ज न घेताच झाला कर्जबाजारी; बनावट आधार, पॅन कार्ड वापरून फसवणूक; राहुरीत गुन्हा दाखल
सांगलीतील द्राक्षबागायतदारांची फसवणूक झाल्यास शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत!