‘या’ आहेत सर्वात जबरदस्त CNG कार्स, 75 रुपयांमध्ये देतात 34km मायलेज; किंमतही आहे कमी…

‘या’ आहेत सर्वात जबरदस्त CNG कार्स, 75 रुपयांमध्ये देतात 34km मायलेज; किंमतही आहे कमी…

कोणत्याही कामासाठी कारने लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी सीएनजी कार पैसा वसूल कार आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सीएनजीची किंमत 77 रुपये आहे, तर पेट्रोलची किंमत 104 रुपये आहे. आता सीएनजीवर चालणारी कार 30-34 किमी/किलो इंधन मायलेज देते. तर पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे मायलेज 15-20 kmpl आहे. यातच जर तुम्हीही परवडणारी सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्यायांबद्दल सांगणार आहोत…

मारुती अल्टो K10 (CNG)

मायलेज: 33.85 किमी/किलो

Maruti Alto K10 CNG तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.  दिल्लीतील एक्स-शोरूम किंमती 5.70 लाख रुपयांपासून सुरू होतात.  या कारमध्ये पावरफुल 1.0L पेट्रोल इंजिन आहे.  ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 33.85 किमी/किलो मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. या कारमध्ये 5 लोकांसाठी बसण्याची जागा आहे.  सुरक्षिततेसाठी कारला EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते.

मारुती एस-प्रेसो (CNG)

मायलेज: 32.73 किमी/किलो

S-Presso ही एक जबरदस्त कार आहे. मात्र याची किंमत आता जास्त असल्याने ग्राहक यापासून दूर जाताना दिसत आहेत.  या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे.  ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 32.73km/kg च्या मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.  कारमध्ये EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आहे.  याची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती वॅगन-आर (सीएनजी)

मायलेज: 34.05 किमी/किलो

जर तुमच्या कुटुंबात जास्त लोक असतील आणि तुम्हाला अशी कार घ्यायची असेल ज्यामध्ये स्पेसची कमतरता नसेल, तर तुमच्यासाठी मारुती वॅगन-आर हा एक चांगला पर्याय ठरू शकते.  यात तुम्हाला चांगली स्पेस मिळते.  या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे, मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार CNG मोडमध्ये 34.43 किमी/किलो मायलेज देते, असं बोललं जात आहे.  सुरक्षिततेसाठी कारला EBD आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम मिळते.  याची किंमत 6.44 लाख रुपयांपासून सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Latur News – जळकोट शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, पाच जण जखमी Latur News – जळकोट शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, पाच जण जखमी
जळकोट शहरातील मार्केट यार्ड परिसरात अविनाश दत्तात्रय गबाळे यांच्या घरात शनिवारी (11 जानेवारी) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या...
‘या’ आहेत सर्वात जबरदस्त CNG कार्स, 75 रुपयांमध्ये देतात 34km मायलेज; किंमतही आहे कमी…
सेल सुरू होण्याआधीच iPhone 15 ची किंमत घसरली, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती
धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मीक कराडला VIP ट्रीटमेंट – संदीप क्षीरसागर
मुंबईतील कुर्ल्यात एका हॉटेलला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली
मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?
राज्यातील राजकारणातील मोठी बातमी, आता शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा