Santosh Deshmukh Case : ‘मकोका’ची कारवाई करताना मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? रोहित पवारांचा सरकारला सवाल
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र मुख्य आरोपी वाल्मीकी कराडवर मोकोका लावण्यात आलेला नाही. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. मकोकाची कारवाई करताना मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. X वर पोस्ट करत त्यांनी हा सवाल विचारला आहे.
X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची सरकारची कारवाई स्वागतार्ह आहे. यामुळं निर्घृणपणे कुणाचाही जीव घेण्याच्या प्रकाराला काही प्रमाणात चाप लागण्यास मदत होईल. मात्र खून आणि मकोकाची कारवाई करताना यातून मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, अन्यथा लोकच त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची सरकारची कारवाई स्वागतार्ह आहे.. यामुळं निर्घृणपणे कुणाचाही जीव घेण्याच्या प्रकाराला काही प्रमाणात चाप लागण्यास मदत होईल. मात्र खून व ‘मकोका’ची कारवाई करताना यातून मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 11, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List