IRCTC Down – आयआरसीटीसीची साईट महिन्याभरात दुसऱ्यांदा झाली डाऊन, प्रवाशांना फटका
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) चे संकेतस्थळ आणि अॅप सेवा गुरुवारी ठप्प झाली. नाताळ आणि नवीन वर्षाच्या तोंडावर आज सकाळी सेवा ठप्प झाल्याने लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर तिकीट बुक होत नसल्याची तक्रार केली होती. ऑनलाईन आऊटेजचा मागोवा घेणाऱ्या डाऊन डिटेक्टरनेही साईट ठप्प पडल्याचे सांगितले होते.
आयआरसीटीसीने आतापर्यंत या मोठ्या आऊटेजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयआरसीटीसी अॅप उघडल्यानंतर unable to perform action due to maintenance activity असा एरर दिसत होता. आयआरसीटीचत्या साइटवर ‘Sorry!!! Please Try again!!’ चा मेसेज दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी या आइटेजवर नाराजी व्यक्त केली आहे.
एका युजरने रेल्वे मंत्र्यांना टॅग करत सकाळी 10 वाजता आयआरसीटीसीची साइट क्रॅश होते आणि जेव्हा ही साईट सुरू झाली तेव्हा सर्व तत्काळ तिकीट बुक केली जातात. हा स्कॅम नाही तर काय आहे. तर अन्य एका युजरने लिहीले की, देश चंद्रावर पोहोचला. मात्र, रेल्वे तिकीट बुकिंग अॅप क्रॅश झाले. तत्काळ बुकिंगला थांबवू शकले नाही. हे 2024 आहे आणि एक स्टेबल सर्व्हर ठेवण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही. आयआरसीटीसीची साइट याआधी 9 डिसेंबरलाही तासाभरासाठी ठप्प झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List