एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,  शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या   ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल 

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकच रस्ता पकडला तो म्हणजे शिवसेना,  60 आमदार निवडून आले, त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावर देखील आता जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे. आम्ही अनेक योजना आणल्या, त्यामुळे लाडक्या मातांनी, बहिणींनी आमच्यावर मतांचा वर्षाव केला. विरोधकांना चारी मुंड्या चित केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी 200 च्यावर आमदार जिंकून दाखवले, त्यांनी माझ्यावर आरोप केले, शिव्या श्राप दिले, पण मी त्यांना कामातून उत्तर दिलं.  अनेक लोकांना स्वप्न पडली होती, हॉटेलचेही बुकिंग केले होते. मात्र ते रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली. विकास योजनांमध्ये खोडा घालणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले.

आता मी डीसीएम आहे. महायुतीने जेवढे प्रकल्प आणले, जेवढ्या योजना आणल्या तेवढ्या इतिहासात कोणी आणल्या नाहीत.    विश्वासाला तडा जाणार नाही, विधानसभेनंतर आता स्थानिक पातळीवर भगवा फडकवायचा आहे, इथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. पूर्वी काही लोक सहकऱ्यांना घरगडी समजायचे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी भाजपनं देखील पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का दिला. पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

म्हाडाच्या आरक्षित रस्त्यांचे आता पालिकेला हस्तांतरण, प्राधिकरणाचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाच्या आरक्षित रस्त्यांचे आता पालिकेला हस्तांतरण, प्राधिकरणाचा महत्त्वाचा निर्णय
म्हाडाच्या मुंबईतील भूभागांवर पालिकेच्या विकास आराखडय़ातील आरक्षित असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचे हस्तांतरण आता पालिकेला तत्काळ करण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा...
राज्यपाल नियुक्त आमदारप्रकरणी सुप्रिम कोर्टात दाद मागणार
सध्याच्या काळात परदेशवारी गरजेचीच बनलीय; हायकोर्टाचे निरीक्षण, शिक्षणासाठी पासपोर्ट देण्याचे आदेश
1950 प्रकल्प रोखले बँक खातेही गोठवले, महारेराची कारवाई म्हाडाच्या मुंबईतील दोन प्रकल्पांचा समावेश
चांदिवलीत बांधकामांवर कारवाई; ‘मिसिंग लिंक’ जोडणीचा मार्ग मोकळा
लाचखोरीच्या आरोपातील न्यायाधीशाची हायकोर्टात धाव, अटकपूर्व जामिनासाठी मागितली दाद
मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देणार