नाराज भुजबळ राष्ट्रवादीची साथ सोडणार का? अजितदादाच्या शिलेदारानं सांगितली आतली गोष्ट

नाराज भुजबळ राष्ट्रवादीची साथ सोडणार का? अजितदादाच्या शिलेदारानं सांगितली आतली गोष्ट

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांची देखील वर्णी मंत्रिमंडळात लागली, त्यांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय देण्यात आलं. दुसरीकडे महायुतीमध्ये आधी मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मात्र नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले झिरवाळ?  

मी भुजबळ साहेबांना भेटलो, नागपूरला रात्री भेट झाली. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज नाहीत तर वागणूक पटली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. राज्यसभा देण्याचा विचार सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर बोलतान ते म्हणाले आता असं कसं म्हणता की राज्यसभा देतो. जनतेची आणि आमची हेळसांड होणार नाही याचा विचार करा, असं भुजबळ यांनी म्हटल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काहीतरी महायुतीचे नेते ऍडजस्ट करतील असा मला विश्वास आहे. भुजबळांना बाजूला ठेवणे कुणालाही परवडणारे नाही, ते भाजपात जाणार नाहीत,  भुजबळ साहेब दादा सोबतच राहतील.  त्यांना ओळखणं फार अवघड असल्याचं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील करण्यात आलं आहे. मात्र पालकमंत्री पदाचं वाटप रखडलं आहे. यावर देखील झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ विस्तार झाला, खाते वाटप झालं. हे चालूच राहातं. समन्यायी वाटप होईल, काहीही होऊ शकतं. मला जर पालकमंत्रिपद मिळालं तर कुठलंही चालेल. मला गोंदिया दिलं तरी चालेल असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरगडी ते अण्णा…! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा प्रवास घरगडी ते अण्णा…! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा प्रवास
साधारण सत्तर ते ऐंशीच्या दशकात बीड जिल्ह्यात केशरकाकू क्षीरसागर यांचा दरारा होता. बाबूराव आडसकरांचा हबाडा राज्यात प्रसिद्ध. शिवाजीराव पंडित, सुंदरराव...
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीचा लाहोरमध्ये मृत्यू
अपहरण करून काढले तरुणाचे अश्लील व्हिडीओ, बँक खात्यातून काढले पैसे
वातावरण बदलाचा फटका, आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव; बागायतदार चिंतेत
पवनचक्कीच्या वादातून धाराशीवमध्ये पुन्हा सरपंचावर हल्ला
बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा, संपूर्ण शहरात अभूतपूर्व बंदोबस्त
वेगवान इंटरनेटमध्ये हिंदुस्थान पिछाडीवर