कझाकिस्तानात विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू; 32 जणांना वाचवण्यात यश, नाताळच्या उत्साहाला गालबोट

कझाकिस्तानात विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू; 32 जणांना वाचवण्यात यश, नाताळच्या उत्साहाला गालबोट

अझरबैजान येथून रशियाला निघालेले विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कझाकिस्तानच्या अक्ताऊ येथे घडली. विमानात एकूण 65 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये दोन्ही वैमानिकांचाही समावेश आहे. विमानातील 32 प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे, तर 22 गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात 2 मुलांचाही समावेश आहे. या मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या विमान दुर्घटनेमुळे नाताळच्या उत्साहाला गालबोट लागले.

दुर्घटनेची चौकशी करणार

विमान दुर्घटनेची विशेष चौकशी करण्यात येईल असे कजाकिस्तानच्या वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. तांत्रिक बिघाडामुळेही विमान कोसळू शकते, असे सांगण्यात येत आहे. तर पक्ष्यांचा समूह विमानाला धडकल्यामुळेही अपघात घडू शकतो असे रशियन मीडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.

जीपीएस जॅमिंगमुळे वैमानिकाचा संदेश पोहोचला नाही

विमानतळावर घिरटय़ा घालत असताना जीपीएस जॅमिंगमुळे वैमानिकाचा संदेश विमानतळ प्राधिकरणापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे वैमानिकाला विमान विमानतळापासून 3 किलोमीटर अंतरावर लँड करावे लागले, परिणामी शेवटच्या क्षणाला विमान लँड करताना ते तिरके झाले आणि जमिनीवर आदळले, असे फ्लाईटरडार 24 ने म्हटले आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर घटनास्थळी 52 फायर फायटर्स आणि 11 बचावपथके रवाना झाली.

नेमके काय घडले?

विमान अजरबैजान येथून रशियाच्या चेचन्या येथील ग्रोज्नी येथे जात होते. त्यासाठी विमानाने बाकू येथून उड्डाण केले; परंतु काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अक्ताऊ येथून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता. कोसळण्यापूर्वी विमानाने विमानतळाला अनेक घिरटय़ा घातल्या. वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. परंतु, विमानतळ प्राधिकरणाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वैमानिकाला विमानतळाजवळ आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंग करताना विमान तिरके झाले आणि जमिनीवर आदळले. यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमधून किंकाळय़ांचा आवाज ऐकू येत होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोसळलेले विमान अझरबैजान एअरलाइन्सचे असून ते एम्ब्रेयर 190 या प्रकारातील होते. विमान कोसळल्यानंतर क्षणार्धात विमानाने पेट घेतला. दरम्यान, विमानात 37 प्रवासी अझरबैजान येथील होते, 16 रशियन, सहा कझाकिस्तानचे आणि 3 प्रवाशी कीर्गीझस्तानचे होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात
मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा...
इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला पवित्रा पुनियाचं सडेतोड उत्तर; म्हणाली “सनातन धर्म..”
बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचे कलेक्शन करणारा हा पहिलाच अभिनेता; सलमान,शाहरूखलाही मागे टाकलं
कायदा-सुव्यवस्थेशी तडजोड नाही..; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली कलाकारांची भेट
बद्धकोष्ठतेचे ‘हे’ गैरसमज दूर करा, उपाय जाणून घ्या
भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी
‘मी सिंगल आहे’, अर्जुन कपूरचं विधान, मलायका अरोराचा पलटवार, म्हणाली…