कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
कणकवली येथील रेल्वे वरिष्ठ अभियंता विभागात कार्यरत असलेल्या प्रकाश पांडुरंग गुजरी यांची केवायसी करून देण्याच्या नावाने मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुजरी यांच्या खात्यातून एका अज्ञात व्यक्तीने 1 लाख 49 हजार 568 रुपये काढले. यानंतर प्रकाश गुजरी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवली आहे
शनिवारी दुपारी 1.52 वाजता गुजरी यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण कॅनरा बँकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. कॅनरा बँकेतून बोलतो असे सांगत पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली असल्याचे सांगितले तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन त्यांच्या खात्यातून 1 लाख 49 हजार 568 रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच प्रकाश गुजरी यांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List