HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

पाच वर्षांपूर्वी साल २०२० मध्ये चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार उडाला होता. यात आजाराने लॉकडाऊन लागून जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. आता चीनमध्ये नव्या विषाणूने डोकेवर काढले आहे. या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP)असे आहे.  कोरोनासारखी परिस्थिती चीनमध्ये निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या विषाणूचे रुग्ण शेजारील कर्नाटक आणि गुजरातमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जगात पुन्हा भीती पसरली आहे. काय आहे हा ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊयात…..

या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसपासून घाबरण्याची काही आवश्यकता नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. या विषाणूवर आम्ही नजर ठेवून असून हा काही नवा विषाणू नसल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. साल २००१ मध्ये हा विषाणू पहिल्यांदा माहिती झाला होता. या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असून सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील असेही नड्डा यांनी म्हटले आहे.चीनमध्ये आढलेला हा विषाणू भारतातील आपल्या शेजारील राज्य कर्नाटक आणि गुजरातमध्ये आढळून आला आहे. या विषाणूची लागण झालेले रुग्ण कर्नाटक आण गुजरात येथे आढळले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय

१ ) या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं आवश्यक आहे.

२ ) गर्दीत जाणे टाळावे आणि इतरांपासून ३ ते ६ फूट अंतर राखावे

३ ) पाणी, साबण किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करावेत

४ ) ५ ते १० दिवसात HMVP ची लागण झालेल्या रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो

५ ) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली औषधे आणि पुरेसी विश्रांची घेतल्यानंतर रुग्ण लवकर बरा होतो

६ ) या व्हायरसवर लस अजून उपलब्ध नाही, मात्र साथ जास्त पसरल्यास लस लवकर येणार आहे

कोणतेही औषध उपलब्ध नाही

या व्हायरसने झालेल्या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. परंतू हा आजार आधीपासूनच माहिती असल्यामुळे जर याची साथ जास्त पसरल्यास आजारावर लवकरच लस उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या आजारास जास्त घाबरण्याची गरज नाही. या आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहेत. मास्क घालणे, गर्दी जाणे टाळणे, इतरापासून ३ ते ६ फूट अंतर ठेवून उभे राहणे आणि पाणी, साबण किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे, नाका तोंडाला हात लावू नये हेच याचे प्रतिबंधक उपाय असल्याचे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे.

आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

याबाबत जी प्राथमिक माहीतीमिळाली आहे. त्यानुसार हा नवीन व्हायरस नाही, पुन्हा हा व्हायरसने चंचुप्रवेश केला आहे,या संदर्भातील एडव्हायजरी लवकरच आम्ही जाहीर करु त्यामुळे फारसे घाबरण्याची काही गरज नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.देशात एचएमव्हीपीचे तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये दोन महिन्याच्या बाळाला हा आजार झालेला आहे. कर्नाटकमध्येही याचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ? पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?
>> प्रभाकर पवार एकोणीसशे नव्वदच्या दशकात उल्हासनगरातील ‘एका शाळेत एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना हरेश पटेल या गुंडाने आपल्या चार...
सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
लक्षवेधक – कोल्ड्रिंक्सवरचा खर्च 24 टक्क्यांनी वाढला
काय सांगता! 6 मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळाली; नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये धाव
पालची खंडोबा यात्रा अपघाताविना आनंदात पार पाडा! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
दहशतीसह विविध गुन्ह्यांत फरारी आरोपीला अटक, मोहोळ पोलिसांची कामगिरी; आरोपी शिंदे गटाचा माजी तालुकाप्रमुख
शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ ला भाववाढीची प्रतीक्षा