…त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला!

…त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसकडून हाच मुद्दा पकडत भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. काँग्रेस खासदारांकडून आंदोलन देखील करण्यात आलं. दरम्यान यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेसकडूनच आरक्षणाला विरोध करण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य अर्धवट ट्विट करत काँग्रेसने जनतेचा आणि संसदेचा वेळ वाया घालवला. आता देखील ते लोकांमध्ये खोटं पसरवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे यासाठी आधी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कसा संविधानाचा अपमान केला, त्यांचा कसा आरक्षणाला विरोध होता हे पुराव्यासह जनतेसमोर आणलं आहे, त्यामुळेच काँग्रेसकडून हे सर्व करण्यात येत आहे.

काँग्रेसकडून आरक्षणाला विरोध होत आला आहे, हे जेव्हा मोदीजींनी संपूर्ण जगासमोर आणलं, तेव्हा काँग्रेस पार्टी अशाप्रकारचं नाटक आता करत आहे. खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकले ते घर लिलावात निघालं होतं, काँग्रेसकडे अनेक संघटनांनी मागणी केली हे घर लिलावात जाऊ देऊ नका, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा ते घर आम्ही घेतलं.

महू असो, दिक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे भाजप सरकारने केलं. काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापराचं आहे. आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे. मात्र त्यांना कुठलाही सन्मान कधीही काँग्रेसने दिलेला नाही. भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही. हे देखील मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. काँग्रेस सरकारनं इंदू मिलमधील स्मारकासाठी जमीन देखील दिली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट 40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन
राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
‘शक्ती’ कायद्याची फाईल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, शिवसेनेच्या मागणीला यश
पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका
फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश