विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं

विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं

बऱ्याचदा सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतात आणि अडचणीत सापडतात. असंच काहीस घडलं विद्याबालनच्या बाबतीत. विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली आहे.

रोहितचं कौतुक करायला गेलेली विद्या बालन अडचणीत

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील शेवटच्या कसोटीमधून स्वत:ला वगळण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच हे जाणून धक्का बसला होता.

सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नसल्याने आपण स्वत:हून संघाबाहेर बसल्याचं रोहितने स्पष्ट केलं. अनेकांनी रोहितच्या या कृतीचं कौतुक केलं असून त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश आहे.

अभिनेता दिग्दर्शक फराहन अख्तरने देखील रोहितचं कौतुक केलं. त्यानंतर अभिनेत्री विद्या बालननेही रोहित बद्दल पोस्ट केली. विद्याने रोहितच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं.

पण या कौतुकाच्या पोस्टमुळेच विद्या बालन चांगलीच अडचणीत सापडली आहे. अनेकांनी तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल करून तिला चांगलेच सुनावले आहेत. अखेर विद्याला तिची ही पोस्ट डिलीट करावी लागली.

पीआरचा मेसेज पोस्ट केल्याने विद्या ट्रोल

त्याचं झालं असं, रेडीटवरील युझर्सच्या दाव्यानुसार, विद्याने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डवलवरही रोहित शर्मासंदर्भात एक पोस्ट केलेली. मात्र ही पोस्ट करताना विद्याने चुकून तिच्या व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट पोस्ट केलेला. या स्क्रीनशॉटमध्ये विद्याने शेअर केलेली ट्विटरवरील पोस्ट ही एका पीआरने शेअर केली होती. विद्याने चुकून पीआरने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला.

पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल
या पोस्टनरून नेटकऱ्यांनी विद्याला चांगलेच सुनावले. विद्यानेही नंतर ही पोस्ट डिलीट केली आहे. विद्याने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन पोस्ट केली होती.

त्यामध्ये तिने, “रोहित शर्मा एक सुपरस्टार आहे! थोडं थांबून श्वास घेण्यासाठीही हिंमत लागते. तुला अधिक बळ मिळो… तुझा अभिमान वाटतो,” असं म्हणत रोहित शर्माचं ट्विटर हॅण्डल टॅग केलेलं. तिच्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्यावेळी विद्याने रोहितसाठी केलेली पोस्ट पीआरचा फॉर्वडेड व्हॉट्सअप मेसेज तिने असल्याचं म्हटलं आणि कमेंट करायला सुरुवात केली.

विद्यासोबत फरहानची पोस्टवरसुद्धा नेटकऱ्यांचा संशय

विद्यासोबत फरहानची पोस्टवरसुद्धा नेटकऱ्यांनी संशय व्यक्त करत ती पोस्ट देखील पीआरचीच असल्याचं म्हटलं आहे. जे कलाकार रोहितला फॉलोही करत नाही त्यांनी पोस्ट कशी केली असा प्रश्न विचारत. चर्चेत राहण्यासाठी पीआरच्या मदतीने पोस्ट करत असल्याच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ? पोलीस डायरी – पप्पू कलानी, अरुण गवळीनंतर कोण? ‘बीड’ मधील सूत्रधारांचे काय ?
>> प्रभाकर पवार एकोणीसशे नव्वदच्या दशकात उल्हासनगरातील ‘एका शाळेत एसएससी बोर्डाची परीक्षा सुरू असताना हरेश पटेल या गुंडाने आपल्या चार...
सोन्याप्रमाणे आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क
लक्षवेधक – कोल्ड्रिंक्सवरचा खर्च 24 टक्क्यांनी वाढला
काय सांगता! 6 मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळाली; नवऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये धाव
पालची खंडोबा यात्रा अपघाताविना आनंदात पार पाडा! जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन
दहशतीसह विविध गुन्ह्यांत फरारी आरोपीला अटक, मोहोळ पोलिसांची कामगिरी; आरोपी शिंदे गटाचा माजी तालुकाप्रमुख
शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ ला भाववाढीची प्रतीक्षा