HMPV Virus पासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? नाकापासून फोनपर्यंत खबरदारी काय?

HMPV Virus पासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? नाकापासून फोनपर्यंत खबरदारी काय?

HMPV Virus Symptoms : चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) हा व्हायरस अत्यंत वेगाने पसरला आहे. या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर होताना दिसत आहे. या व्हायरसची सर्वाधिक लागण लहान मुलांना झाली असून लहान मुलांचे वॉर्ड कमी पडताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे चीनच्या आरोग्य खात्याचं कंबरडं मोडलं आहे. भारतातही या व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. मात्र, तरीही घाबरण्याचं काही कारण नसल्याचं भारत सरकारकडून सांगितलं जात आहे. तरीही या व्हायरसपासून बचावासाठी काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे.

14 वर्षाखालील मुलांना सर्वाधिक लागण

चीनचा नॅशनल मीडिया चायना डेलीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एचएमपीव्ही व्हायरसचे रुग्ण वाढले आहेत. संसर्गामुळे हा आजार फैलावल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. 14 वर्षाखालील मुलांमध्येच हा व्हायरस सर्वाधिक दिसत आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

काळजी काय घ्याल?

या व्हायरसपासून वाचायचे असेल तर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे हा आजार फैलावतो. त्यामुळे कमीत कमी 20 सेकंदापर्यंत साबणाने हात वारंवार धुतले पाहिजे. चेहरा खासकरून डोळे, नाक आणि तोंडाला हात लावू नका. त्यामुळे हा व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, गळ्यात खवखव होत असेल, तापासारखी लक्षणे असतील तर घरीच थांबा. तुमच्यामुळे इतरांनाही रोगाची लागण होऊ शकते.

या आजाराला रोखायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी गेला तर तोंडाला मास्क लावा, नियमितपणे दरवाजाचे हँडल, लाइट स्विच आणि स्मार्टफोन स्वच्छ ठेवा. ज्या लोकांमध्ये आजाराचं लक्षण आहे, त्यांच्यापासून दूर राहा. जर तुमच्यात एचएमपीव्हीची लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांना भेटा.

लक्षणे काय आहेत?

या आजाराचे लक्षणे सामान्यच आहे. ताप येणे, खोकला, नाक बंद होणे, घशात घरघर होणे किंवा खवखवणने, श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आदी या आजाराची लक्षणे आहेत. हा आजार झाल्यास गंभीर प्रकरणात ब्रोंकाइटिस किंवा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

चीनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, 2023 मध्ये सांगण्यात आले की, 2009 ते 2019 पर्यंत श्वसन संबंधित संसर्गजन्य रोगांच्या आकडेवारीनुसार, HMPV हा श्वसन संबंधित संसर्ग निर्माण करणाऱ्या 8 व्हायरसपैकी 8व्या स्थानावर आहे, ज्याची पॉझिटिव्हिटी दर 4.1 टक्के आहे.

HMPV कसा पसरतो?

HMPV संसर्गित व्यक्तीच्या खोकण्यामुळे किंवा शिंका येण्यामुळे श्वसन कणांच्या माध्यमातून पसरतो. जर हा व्हायरस वातावरणात पसरलेला असेल, तर त्याच्या संपर्कात आल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. HMPV सर्वात जास्त थंडीच्या दिवसांत पसरतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील ‘या’ तेलामुळे होऊ शकतो कर्करोग; जाणून घ्या निरोगी जीवनाचा आरोग्य मंत्रा…. स्वयंपाकघरातील ‘या’ तेलामुळे होऊ शकतो कर्करोग; जाणून घ्या निरोगी जीवनाचा आरोग्य मंत्रा….
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या तेलाचा आणि मसाल्यांचा वापर केला जातो. आजकाल...
‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
दुबईत साऊथच्या सुपरस्टारचा भयंकर अपघात, कारचे टप हवेत उडाले; व्हिडीओ पाहून हादरले फॅन्स
Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या
फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा
गौरीची ‘ती’ अवस्था पाहून लग्नाच्या पहिल्याच रात्री शाहरूख खान ढसा ढसा रडला होता; असं काय घडलं होतं?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता