हिवाळ्यामध्ये आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे… ऐकुन व्हाल थक्क
बदलत्या ऋतूमध्ये बाजारामध्ये अनेक विविध प्रकारचे फळं पाहायला मिळतात. फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते त्यासोबतच तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते. हिवाळ्याच बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आलू बुखारा पाहायला मिळतात. अनेकजण अगदी आवडीने आलू बखारा या फळाचे सेवन करतात. फळांचे सेवन केल्यास तुमच्यया शरारातील साखरेची पातळी नियंत्रित राहात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळांचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरतात. अनेकजण दरोरजच्या आहारामध्ये फळांचे सेवन करतात.
आलू बखाराची चव आंबट गोड असते आणि त्याचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आलू बुखारा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. आलू बुखारामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पॉलीफेनोल आणि कॅरोटिनॉयड यांच्यासारखे पोषक तत्वं असतात ज्यामुळे हिवाळ्यात तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि संसर्गाचे आजार होत नाहीत. तुमच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती योग्य प्रमाणात असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रमाचे आजार किंवा संसर्ग होत नाही. चला तर जाणून घेऊया का आहेत आलू बुखाराचे फायदे.
आलू बुखारामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते ज्यामुळे संसर्गाचे आजार होत नाही. व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. आलू बुखार खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. त्यासोबतच हिवाळ्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आलू बुखारमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी ज्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते आणि हृदय विकाराचा धोका टळण्यास मदत होते. त्यासोबतच आलू बुखारामुळे भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. आलू बुखाराचे नियमित सेवन केल्यमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर्करोगाचा त्रास होत नाही. आलू बुखाराचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते. आलू बुखारामघ्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील वजन नियंत्रित राहाण्यास मदत होईल. आलू बुखारामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
आलू बुखारा खाण्याचे नुकसान जाणून घ्या :
आलू बुखारा जास्त प्रमाणात काल्ल्यामुळे बद्धकोष्ठताची समस्या होऊ शकते.
आलू बुखराचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि पोट फुगणे यांच्या सारख्या समस्या होतात.
जास्त प्रमाणात आलू बुखारा खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या होऊ शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List