जाणून घ्या हिवाळ्यात अळशीच्या बिया खाण्याचे फायदे अन् तोटे
हिवाळा आपल्या सोबत थंडी आणि आळस घेऊन येतो. परंतु आरोग्याची विशेष काळजी घेण्याची देखील हिवाळ्यात आवश्यकता असते. हिवाळ्यात योग्य आहार घेतल्याने शरीर उबदार आणि ऊर्जावान राहण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये अळशीच्या बियांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जाते. अळशीच्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर प्रोटीन अँटिऑक्सिडंट आणि लिग्नॅन्स मोठ्या प्रमाणात असतात. अळशी केवळ थंडीपासूनच शरीराचे संरक्षण करत नाही तर हृदय,त्वचा, केस आणि पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. अळशीचे आणखीन बरेच फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे काही तोटे देखील आहेत. जे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे आणि चुकीच्या प्रमाणात खाल्ल्यामुळे होऊ शकतात. जाणून घेऊया अळशी खाण्याचे फायदे आणि तोटे.
हिवाळ्यात अळशी खाण्याचे फायदे
शरीर उबदार ठेवण्यासाठी:
हिवाळा शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अळशी फायदेशीर आहे. अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते:
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक असते. अळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि लिग्नान रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारापासून बचाव होतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते:
अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि पोटॅशियम असते ज्यामुळे हृदयाच्या धमन्या निरोगी राहतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते.
पचनक्रिया सुधारते:
हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या होऊ शकतात. अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट साफ करण्यास मदत करते.
त्वचा आणि केस निरोगी ठेवते:
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि केस निर्जीव होतात. अळशीमध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेला आद्रता देतात आणि केसांचे पोषण करतात. त्याची चमक आणि ताकद टिकवून ठेवतात.
वजन कमी करण्यास मदत करते:
अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. हिवाळ्यात जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
अळशी खाण्याचे तोटे
अतिसेवनामुळे नुकसान:
अळशी मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जास्त प्रमाणात ते खाल्ल्याने पोटदुखी, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ शकते. त्यामुळे त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते शक्य असल्यास दररोज एक ते दोन चमचे पेक्षा जास्त जवस खाऊ नये.
रक्तदाब आणि रक्तातील साखरेवर परिणाम:
अळशी रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी करू शकतात. तुम्हाला कमी रक्तदाब किंवा हायपोग्लायसेमियाचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्याशिवाय अळशी खाऊ नका.
गर्भवती महिलांसाठी हानिकारक:
गर्भवती महिलांनी अळशी खाण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या. या मध्ये असलेल्या लिग्नॅन्समुळे हार्मोनल असंतुलित होऊ शकतात.
किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी हानिकारक:
अळशी मध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे किडनी स्टोन ची समस्या वाढू शकते. त्यामुळे जर कोणाला किडनी स्टोन असेल तर त्यांनी चुकूनही याचे सेवन करू नका.
अळशी खाण्याची योग्य पद्धत
अळशी हलकी भाजून ती तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात. त्यासोबतच अळशी बारीक करून दूध किंवा कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकतात. याशिवाय कोशिंबीर किंवा दह्यात मिसळून देखील खावू शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List