छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाला लक्ष्य करत नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट; 9 जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करत हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांना सुरक्षादलाला लक्ष्य करत आयईडी स्फोटकांचा स्फोट घडवला. या नक्षलवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे 9 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी वाहनात आयईडी स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.
डीआरजीचे जवान वाहनातून प्रवास करत होते, त्यांना लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा दलाच्या ताफ्याजवळ आले आणि स्फोट झाला, असे सांगण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List