उत्तर प्रदेशात तीन खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर केला होता ग्रेनेड हल्ला
उत्तर प्रदेशातील पिलभीत येथे झालेल्या चकमकीत 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पिलभीत पोलीस आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी खलिस्तान कमांडो फोर्सचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 19 डिसेंबर रोजी पंजाबमधील गुरुदासपूर जिह्यातील पोलीस चौकीवर ग्रेनेडने हल्ला केला होता.
दहशतवाद्यांकडून 2 एके-47 रायफल आणि 2 पिस्तूल तसेच मोठ्या प्रमाणावर काडतुसे हस्तगत करण्यात आली. गुरुविंदर सिंग (23), वीरेंद्र सींग ऊर्फ रवी (25) आणि जसप्रीत सिंग ऊर्फ प्रताप सिंग (18) अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असून ते सर्व गुरदासपूरचे रहिवाशी आहेत. पिलभीतमधील पुरनपूर कोतवाली भागात ही चकमक झाली. चकमकीत गंभीर झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांना पुरणपूर सीएचसीमध्ये आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले, अशी माहिती पंजाबचे पोलीस महानिरीक्षक गुरव यादव यांनी दिली. या कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉडेल उद्ध्वस्त केल्याचे ते म्हणाले. पिलभीत पोलीस आणि पंजाब पोलीस तसेच दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुमारे 100हून अधिक राऊंड फायर करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List