मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
मध्य प्रदेशातील सागर येथील एका मंदिरात तोडफोडीची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. शनिवारी ही घटना घडल्यानंतर या भागात तणाव वाढला. तोडफोड करणारे युवक जैन समाजातील असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण मास्क घालून आले होते आणि त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप लोकांनी केला आहे. तसेच काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप हिंदू समाजाकडून करण्यात आला आहे. खासगी हिंदी वृत्तसंकेतस्थळांवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक जैन मंदिरावर हल्ला करत आहेत. हे प्रकरण मध्य प्रदेशातील सागर येथील आहे. या व्हिडीओ मध्ये जैन मंदिरावर हल्ला करणारे लोक जय श्री रामचा नारा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि विविध प्रकारच्या कमेंट्स देत आहेत. एका युजरने म्हटले की, ‘अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांनंतर आता जैन समुदायाला लक्ष्य केले जात आहे’. या व्हिडीओची दैनिक सामना पुष्टी करत नाही.
आज राहत इंदौरी साहब का एक शेर याद आ रहा है
लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है’
अल्पसंख्यकों में मुस्लिमों, ईसाईयों के बाद अब जैन समाज को टारगेट किया जा रहा है ।
मध्य प्रदेश के सागर में जैन मंदिर में “JSR” के नारे लगाकर तोड़ फोड़ करी गई है । pic.twitter.com/3UlX1Ftt9d
— AKSHAT JAIN (@AkshatJ12205226) January 5, 2025
मध्य प्रदेशातील सागर येथील बडा बाजार येथे असलेल्या जैन मंदिराची जागा रिकामी करत असताना काही लोकांनी जडिया समाजाच्या कुलदेवीच्या मंदिरावर हल्ला करत तोडफोड केली. या घटनेत तीन जण जखमी झाल्याने प्रकरणाने मोठे वळण घेतले. जडिया कुटुंबातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सराफा बाजारातील व्यापारी जमा झाले आणि त्यांनी आपली दुकाने बंद करून कोतवाली पोलीस ठाण्यासमोर बेमुदत बंद पुकारला.
सुमारे तीन तास आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने लोक संतप्त झाले असून, याप्रकरणी सागरचे आमदार शैलेंद्र जैन यांनाही यात ओढले. सराफा लोकांनीही त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सीएसपी आणि शहर दंडाधिकारी यांनी घटनास्थळी येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापारी कारवाईवर ठाम होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List