लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
तुम्ही अनेकदा व्हिडिओमध्ये पाहिले असेल की जिम किंवा विमानतळावर एखादा सेलिब्रिटी दिसताच लोक त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धावतात. अशा वेळी अनेकवेळा त्याचे बॉडीगार्ड गर्दी हटवण्यासाठी कोणाला तरी धक्काबुक्की करतात. गर्दी हटवण्यासाठी हे सर्व केले आहे असे तुम्हाला वाटते. याबाबत अभिनेता सोनू सूदने मोठा खुलासा केला आहे.
सध्या अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट ‘फतेह’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सोनू सूद सज्ज झाला आहे. अलीकडेच सोनू सूदने ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला एक मुलाखत दिली. यावेळी त्याने सेलिब्रिटी आणि कलाकारांच्या बॉडीगार्डबाबत वक्तव्य केले.
लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रिटी आणि कलाकार यांच्या बॉडीगार्ड्सला विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हे लोक जाणूनबुझून असे करतात. विशेषतः विमानतळासारख्या ठिकाणी मोठ्याने आवाज करतात आणि लोकांचे लक्ष वेधून घेतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List