नागपूरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू, व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्राना अलर्ट जारी
नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये H5N1 विषाणूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. डिसेंबर महिन्यात वाघ आणि बिबट्याचे मृत्यू झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना अलर्ट जारी करण्यात आला होता. डिसेंबरमध्ये या प्राण्यांना चंद्रपूरहून गोरेवाडा येथे हलवण्यात आले होते, तेथे त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबरला एक वाघाचा तर 23 डिसेंबरला आणखी दोन वाघांचा मृत्यू झाला. मृत वाघांचे नमुने ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस येथे पाठवण्यात आले होते. नमुने तपासल्यानंतर मृत वाघ H5N1 पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
तीन वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर बचाव केंद्रातील 26 बिबट्या आणि 12 वाघांची तपासणी करण्यात आली. मात्र ते निरोगी आढळले. संक्रमित किंवा कच्चे मांस खाल्ल्याने या प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List