अमोल कीर्तिकर यांना मातृशोक, मेघना कीर्तिकर यांचे निधन
शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांच्या आई मेघना कीर्तिकर यांचे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. त्यांचे वयाच्या 82व्या वर्षी अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. अंत्यदर्शनासाठी मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान स्नेहदीप, पहाडी रोड नं. 2, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व) या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List