अशी विकृत वक्तव्ये हीच त्यांची मानसिकता…रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

अशी विकृत वक्तव्ये हीच त्यांची मानसिकता…रमेश बिधूडी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप नेते आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधूडी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरुन काँग्रेसमधून संताप व्यक्त केला जात असून पवन खेडा यांनी अशाप्रकारची विकृत वक्तव्ये यातून त्या माणसाची मानसिकता दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते असा हल्लाबोल केला आहे.

पवन खेडा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर रमेश बिधूडी यांचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट शेअर करत टीका केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बिधूडी म्हणत आहेत की, लालू म्हणाले होते की, राज्यातील रस्ते हेमामालिनी गालासारखे बनवणार. लालू खोटं बोलले होते. ते बनवू शकले नाही. मात्र मी तुम्हाला आश्वासन देतो की, जसे ओखलाचे रस्ते आम्ही बनवले, संगम विहारचे रस्ते बनवले, अशाचप्रकारे कालकाजीमधील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत बनवू. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून काँग्रेसने यावर संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे पवन खेडा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी लिहीले की, अशाप्रकारची विकृत वक्तव्ये यातून त्या माणसाची मानसिकता दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता दर्शवते. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजप महिलांच्या विरोधात आहे. भाजपचे माजी खासदार आणि आता कालकाजी येथून पक्षाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी प्रियंका गांधींविरोधात केलेले वक्तव्य लज्जास्पद आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी काही बोलतील का? असा थेट सवाल करत महिलाविरोधी भाषेचे आणि विचारसरणीचे जनक खुद्द पंतप्रधान मोदी आहेत, ज्यांनी ‘मंगळसूत्र’, ‘मुजरा’ असे शब्द  आपल्या भाषणात वापरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल
Mumbai Torres Jewellery Scam : मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर...
अंधेरीत इमारतीला भीषण आग, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?
दीड वर्षांतच दुसऱ्यांदा आई बनली सना खान; धर्माचं कारण देत सोडलं होतं बॉलिवूड
शुभमन गिलसोबतच्या नात्यावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या कुटुंबीयांना..”
सरकारने निधी अडवला; पालघरचे सिव्हिल, ट्रॉमा केअर सेंटर व्हेंटिलेटरवर, प्रशासनाविरोधात स्थानिकांचा संताप
अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते, भाजपच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या; संजय राऊत यांचा घणाघात