Santosh Deshmukh Case – आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? संतोष देशमुख यांच्या मुलीचा सरकारला सवाल

Santosh Deshmukh Case – आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? संतोष देशमुख यांच्या मुलीचा सरकारला सवाल

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे सामाजिक आणि राजकिय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तसेच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेला एक महिना होऊन गेला आहे. परंतु अजूनही काही आरोपी हे मोकाटच आहेत. आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सरकारला केला आहे.

संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये “जन आक्रोश मोर्चा”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तसेच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराडला फाशी द्या, गृहमंत्री साहेब बीड चा बिहार होऊ देणार का? अशा आशायचे पोस्टर्स यावेळी संतप्त नागरिकांनी झळकावले. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे सुद्दा सहभागी झाले होते.

“आम्ही न्याय मागत आहोत हीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला, तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? माझी सरकारला विनंती आहे की, जे कोणी आरोपींची मदत करत असतील, तर त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आम्ही आज न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय द्या हीच आमची मागणी आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे.” असं वैभवी देशमुख म्हणली.

“आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. तसेच आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. न्याय कुठल्या पद्धतीने द्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची लवकरच आम्ही भेट घेणार आहोत किंवा ते आमची भेट घेतली, असे यावेळी धनंजय देशमुख म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल
Mumbai Torres Jewellery Scam : मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर...
अंधेरीत इमारतीला भीषण आग, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?
दीड वर्षांतच दुसऱ्यांदा आई बनली सना खान; धर्माचं कारण देत सोडलं होतं बॉलिवूड
शुभमन गिलसोबतच्या नात्यावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या कुटुंबीयांना..”
सरकारने निधी अडवला; पालघरचे सिव्हिल, ट्रॉमा केअर सेंटर व्हेंटिलेटरवर, प्रशासनाविरोधात स्थानिकांचा संताप
अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते, भाजपच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या; संजय राऊत यांचा घणाघात