पोरबंदर तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू
गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. कोस्ट गार्डच्या एअर एन्क्लेव्हमध्ये रविवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर हेलिकॉप्टरमधून उडी मारलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. तटरक्षक दलाचे एडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताबाबत तटरक्षक दलाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. स्थानिक पोलिसांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.
तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर (एएलएच) ध्रुव कोस्ट गार्ड तळावर उतरत असताना अपघात झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. हेलिकॉप्टर कोसळत असताना जीव वाचवण्यासाठी एकाने उडी घेतली. मात्र दुर्दैवाने तो वाचू शकला नाही. तर दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List