आणखी एक अतुल सुभाष, पत्नीवर गंभीर आरोप करत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

आणखी एक अतुल सुभाष, पत्नीवर गंभीर आरोप करत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

अतुल सुभाष आत्महत्याप्रकरण ताजे असतानाच आता गुजरातमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. येथील बोटाडमध्ये पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून पत्नीवर गंभीर आरोप करत तिला धडा शिकवण्याचे नातेवाईकांना आवाहन केले आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी त्याच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल केला आहे,

ही घटना गुजरातच्या जमराला गावामध्ये घडली आहे. 39 वर्षीय सुरेश साथदिया याचे लग्न जवळच्याच नवागावात राहणाऱ्या तरुणीशी झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्याची पत्नी दरवेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन वाद उकरुन माहेरी निघून जायची. तरुणाने वारंवार घरी परतण्यासाठी बोलावूनही ती यायची नाही. यावेळीही ती वाद करुन निघून गेली होती. अनेकदा समाजावूनही ती सासरी परतली नाही. ज्यावेळी सुरेश तिला आणायला सासरी गेला त्यावेळी तिने पुन्हा सासरी येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर निराश होऊन सुरेश आपल्या घरी परतला आणि त्याने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ बनवला. त्यात त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. त्याने व्हिडीओत म्हटले की, पत्नीने प्रचंड मानसिक त्रास दिला असून तिच माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. शिवाय तिला याची शिक्षा व्हायला हवी असे आवाहनही त्याने नातेवाईकांना केले आहे.

आत्महत्येनंतर सुरेशच्या नातेवाईकांना त्याच्या फोनमध्ये हा व्हिडीओ मिळाला आहे. सुरेशच्या वडिलांनी शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत एफआयआर दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सुनेने मुलाचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सुन वारवार मुलासोबत भांडण करायची आणि माहेरी निघून जायची. मुलगा सासरवाडीला जाऊन सुनेला घ्यायला गेला होता, मात्र तिने घरी परतण्यास नकार दिला, त्यामुळे मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंच वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक...
हिरवा चुडा अन् मेहंदी..; त्या फोटोमुळे समृद्धी केळकरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : धनश्रीने नॅशनल टीव्हीवर केला चहलचा अपमान ?
सलमानच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच, भिंतीवर काटेरी तार..; सुरक्षेच्या कारणास्तव मोठे बदल
HMPV भारतासाठी धोकादायक ? तुमच्या मनातील ‘A टू Z’ सर्व प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Human Metapneumovirus: आतापर्यंत HMPV चे देशात 6 रुग्ण, केंद्र सरकार सतर्क
हिवाळ्यात ब्रेकफास्टमध्ये ‘हे’ खा, अल्पावधीत तंदुरुस्त व्हाल