रायगड जिल्ह्यात लाडक्या बहिणी असुरक्षित; 7 वर्षांत 443 अत्याचार, 820 विनयभंग
मोठा गाजावाजा करत मिंधे सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात बहिणींचीच सुरक्षा महाराष्ट्रात वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या असून रायगड जिल्ह्यात सात वर्षांत अत्याचार व विनयभंगाचे एकूण 1 हजार 263 गुन्हे दाखल केले गेले आहेत. यात सर्वाधिक 820 घटना विनयभंगाच्या असून 443 जणींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. खोके सरकारच्या काळात बहिणीच असुरक्षित ठरत आहे.
रायगड जिल्ह्यात अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. दर आठवड्याला सरासरी तीन ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. तसेच लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे आमिष तसेच इतर प्रकारे शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याच्या तक्रारीही दाखल होत आहेत. यातील 99 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेली महिला बदनामीला घाबरून गप्प बसत होती. मात्र आता महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List